
नाशिक:-( प्रतिनिधी )पुणे येथे सुरू असलेल्या पुणे बुक फेस्टमध्ये वैशाली प्रकाशन प्रकाशित स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या इंग्रजी चरित्रग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या पुणे बुक फेस्ट या भारतातील सर्वात मोठ्या पुस्तक प्रदर्शनात ज्येष्ठ समीक्षक आणि अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्या हस्ते आणि ग्रंथाच्या लेखिका डॉ.दाक्षियाणी पंडित, प्रकाशक विलास पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. रवींद्र गुर्जर आणि डॉ.सदानंद मोरे यांनी ग्रंथाबद्दल विचार मांडून लेखिका आणि प्रकाशक यांचे कौतुक केले. डॉ.प्रतिभा हरणखेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
