
ओझर: दि.१३ (वार्ताहर)
येथील ‘मविप्र’ संस्थेचे माधवराव बोरस्ते विद्यालयात शिक्षक पालक मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या दैनंदिन शालेय समस्येबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सदस्य निवृत्ती शेटे समीर मोरे ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत रेखा देशमाने आत्माराम शिंदे उपस्थित होते. पालकांतर्फे मनीषा भिकुले कविता जगताप राधा ससाने वैशाली चव्हाण शितल मढे मनीषा काळे संतोष शिंदे भाऊसाहेब जाधव अनिल काळे संतोष पवार संदीप साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सह्याद्री किड्सलॅब तर्फे बी एस कंपनीकडून मिळालेल्या चित्रकला शिष्यवृत्ती निमित्त ईश्वरी मोरे ईश्वरी जाधव या विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात भास्करराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या दैनंदिन समस्येवर सविस्तर चर्चा करून शिक्षक व पालकांनी समन्वयाने विद्यार्थ्यांच्या अभ्यास व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी मेळाव्यास बहुसंख्य पालक -शिक्षक उपस्थित होते. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम सविता पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले, शितल हांडोरे यांनी केले. पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.
