
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे चौहान बिटको माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथील दोनदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक व वक्ते डॉ. अश्विनी कुमार भारद्वाज माजी विद्यार्थी व वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश चौधरी, प्रसिद्ध लेखक व नाट्यअभिनेते जयंत ठोमरे,स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, सचिव जयसिंह पवार, शालेय समिती अध्यक्षा अलका घरटे, सोसायटीचे सदस्य विक्रम सारडा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी ,पर्यवेक्षक किशोर झोटिंग ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विजय रसाळ, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्षा हेमलता चौधरी, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा संजना पास्ते आदी मान्यवर उपस्थित होते . विद्यालयाच्या गीतमंचाने आपल्या सुस्वरातून स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या रांगोळी, विज्ञान व कला व क्रीडा या दालनांचे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यामध्ये रामकेश प्रजापती ,गौरी गामणे या दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. आपल्या मनोगतात पाहुण्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व प्रत्येक कामात समरसून राहण्यात व आनंद मानण्यातच खरा जीवनाचा अर्थ दडला आहे असे व्यतित केले. माजी विद्यार्थी डॉ.मंगेश यांनी शालेय आठवणींना उजाळा देत प्रयत्न वादी राहण्याचा मोलाचा संदेश दिला.तर जयंत ठोमरे सरांनी आपल्यातील कलेला सतत प्रेरित ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला . यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे अनेक कला गुणदर्शक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यामध्ये देशभक्तीपर गीतावरील नृत्य,वेगवेगळ्या प्रांताची माहिती देणारे नृत्य ,शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारे नाटक महाराष्ट्राची संस्कृती सांगणारी महाराष्ट्राची लोकधारा छत्रपती संभाजी महाराजांची महती विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून सादर केली. उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक किशोर झोटिंग यांनी मानले . या सर्व कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन धनश्री हिरे, समीक्षा चुंभळे लक्षिता तांबोळी, सृष्टी शिंदे, ऋषिकेश गुरव हेमाक्षी महाले या विद्यार्थ्यांनी केले. स्नेहसंमेलन सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
