
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११८ वा दिवस
आपली विचारशक्ती व प्रेमशक्ती अधिक सखोल करा. स्वतःचे जीवनकमल विकसित करा. भ्रमर आपण होऊन आपल्याकडे येतील. प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. मग ईश्वरावर विश्वास ठेवा. मूठभर बलवान माणसे जगाला हलवू शकतील. संवेदनाशील ह्रदय, विचारशील मेंदू, प्रेम भावना आणि निःस्वार्थ कर्म करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न बाहू या साऱ्यांची आपल्याला आवश्यकता आहे. प्रेम भावनेने प्रेरित होऊन केलेले काम ख-याअर्थांने सार्थकी लागेल यात शंका नाही. प्रेम भावना ही खरोखर चैतन्यमयी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५
★ १९८६ हिंदी चित्रपट अभिनेत्री खान्देश कन्या स्मिता पाटील यांचा स्मृतीदिन
★ १९९४ वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक श्री. विश्वनाथ आण्णा उर्फ तात्यासाहेब कोरे यांचा स्मृतीदिन
★ २००१ भारताच्या संसंद भवनावर दहशतवादी हल्ला
★ २००५ हिंदी चित्रपट निर्माते, निर्देशक, रामायणकार रामानंद सागर यांचा स्मृतीदिन.
