
सिन्नर ( प्रतिनिधी)१२ डिसेंबर २०२५ हुतात्मा बाबु गेनू यांचा ९५ वा बलिदान महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
ब्रिटिश सरकार भारतीय उद्योगांवर बंधने आणून इंग्रजांचे उत्पादन देशात जबरदस्तीने विकत होती. त्यांना विरोध करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. बाबू गेनू यांनी देखील या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.बाबू गेनू यांच्या बलिदानाची घटना १२ डिसेंबर, १९३० रोजी मुंबई येथे घडली. त्या दिवशी ब्रिटिश मालवाहू ट्रक भारतीय बाजारपेठेत इंग्रजी कापडाची वाहतूक करत होता. स्वदेशी चळवळीचा कट्टर समर्थक असलेले बाबू गेनू यांनी हा ट्रक थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ट्रकसमोर धरणे धरले आणि जोरदार घोषणा देऊ लागले. ब्रिटिश पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी जबरदस्त मारहाण केली, पण बाबू गेनू माघार घेण्यास तयार नव्हते. शेवटी इंग्रजांनी निर्दयीपणे ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे हे बलिदान पाहून संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली.

स्वातंत्र्यसैनिक अधिक जोमाने चळवळींमध्ये सहभागी होऊ लागले. बाबू गेनू यांच्या बलिदानाने ब्रिटिशांविरोधातील असंतोष अधिक वाढला आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला आणखी बळ मिळाले.बाबू गेनू यांनी केलेले बलिदान भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले.अशा महान हुतात्मा बाबू गेनू यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश शिरसाठ यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार भुषण मोरे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे शिरसाठ भूषण मोरे आकाश धोंगडे प्रकाश गुंजाळ मुना गुंजाळ योगेश मोरे राकेश सोनवणे संदिप मुठे आदी.उपस्थित होते
