
इंग्लिश संकुल नांदगाव: जवाहर नवोदय विद्यालय चाचणी परीक्षा 2025-26 साठी केंद्र क्रमांक 13: 11: 09:01 न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव परीक्षार्थींची बैठक व्यवस्था वरील प्रमाणे आहे.
(1) सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पेपरला येताना ठीक सकाळी 10. वाजेपर्यंत विद्यालयात हजर राहावे. येताना पॅड,पेन, परीक्षा प्रवेश पत्र, पाणी बॉटल या वस्तू बरोबर आणाव्यात.
(2) कॅल्क्युलेटर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ इत्यादी वस्तू परीक्षा कक्षात घेऊन जाता येणार नाही.
(3) परीक्षार्थी बरोबर पालक शिक्षक इतर कोणीही आल्यास त्यांना बेल नंतर शालेय प्रांगणात थांबता येणार नाही.
(4) विद्यार्थ्यांना घेऊन येणारी वाहने मोटरसायकल शालेय कंपाऊंडच्या बाहेरच आपल्याजबाबदारीवर ठेवावी.
(5) संपूर्ण शालेय परिसराला सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने व पोलीस संरक्षण असल्याने बाह्य पालकांनी कोणीही शालेय आवारात थांबू नये. वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे.
केंद्राध्यक्ष,
श्रीमती काळे ज्योती रामकृष्ण
न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव
