
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११७ वा दिवस
भारतात आणि केवळ येथेच मानवी ह्रदय इतके विशाल, अनंत झाले की, त्यात केवळ मनुष्यजातच नव्हे तर पशु-पक्षी, इतकेच नव्हे तर एका मरुकणासह श्रेष्ठतम आणि कनिष्ठतम सार्यांनाच स्थान मिळाले. येथेच मानवी आत्म्याला उमगले की, सारे विश्व एक अखंड आहे. त्याचा स्वतःचा प्राणस्पंद हा विश्वाचा प्राणस्पंद झाला.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०२५
★ १८७२ हिंदू महासभेचे संस्थापक, नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची जयंती
★ ब्रिटिशांनी भारताची राजधानी १९११ साली कलकत्ता येथून दिल्ली केली.
★ १९३० हुतात्मा बाबू गेणू यांचा स्मृतीदिन
★ १९४० भारताचे माजी कृषीमंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा जन्मदिन
★ १९४९ पूर्व केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जन्मदिन
★ २०१५ भारतीय शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचा स्मृतिदिन
★ स्वदेशी दिन.
