
तंबाखू मुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरविली व्हर्चुअल ऑनलाईन विभागीय बाल परिषद
शालेय आणि गावस्तरावर तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत कार्य करीत असताना विद्यार्थ्यांना ग्रामीण स्तरावर स्वच्छता, शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखुविक्री अशा काही समस्या जाणवल्या आहेत, काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि चांगले अनुभव देखील आलेले आहेत. या अनुभवांची देवाण घेवाण व्हावी व विद्यार्थ्यांना निंर्माण झालेल्या प्रश्नांची उकल व्हावी तसेच शालेय आणि गाव स्तरावर मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या कृती कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या कार्यास एक व्यासपीठ मिळावे आणि मुलांचा तंबाखू मुक्तीचा आवाज बुलंद व्हावा या हेतूने दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी ऑनलाईन झूम अँप च्या माध्यमातून बालपरिषदेचे आयोजन केले होते.

सलाम मुंबई फाउंडेशनने वर्ष २०२५-२६ मध्ये तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक विभाग व पुणे विभाग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्राम पंचायत इ.भागधारकांना तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे यश लक्षात घेता या कार्यक्रमात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा. आणि शालेय स्तरावर तंबाखूमुक्त शाळा मोहीम अधिक मजबूत व्हावी. याहेतूने यावर्षी प्रथमच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त , नाशिक विभागातील व पुणे विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात या हेतूने बालपरिषदेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शासकीय विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधान कारक उत्तरे शिक्षण , प्रसार माध्यम विभाग इत्यादी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. या बालपरिषदेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांनी भारत सरकारच्या आरोग्य विभागाने पारित केलेल्या ०९ निकषांची पूर्तता करावी हा संदेश जाईल आणि नाशिक विभागातील व पुणे विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त होण्यास पुढाकार घेतील.
नाशिक विभागातील व पुणे विभागातील जिल्ह्यातील यंग प्रतिनिधींनी एकत्र येऊन नाशिक विभाग व पुणे विभाग जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी तसेच आरोग्य आणि स्वच्छता या विषयांवर समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी बालपरिषद हे व्यासपीठ तयार केले होते. बालपरिषदेच्या माध्यमातून मुले तंबाखूमुक्त शाळा अभियान सक्षम करण्यासाठी एकत्र येत आहेत. या बालपरिषदेमध्ये विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागातून मान्यवरांनी मार्गदर्शन केले यात मुख्यतः१) कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग सोलापूर
२) जितेंद्र साळुंखे अधिव्याख्याते डायट विभाग सोलापूर
३) जयश्री सरस्वत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, पुणे
४) राजू ठाकरे, मीडिया विभाग नाशिक विभाग
यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या या चळवळीचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन इगतपुरी व मालेगाव तालीक्यातील विद्यार्थिनी गीता आहेर व पूर्वा म्हसणे यांनी केले.तसेच मान्यवरांचे आभार प्रदर्शन सलाम फाउंडेशनचे विशाल जाधव यांनी केले. सदर बालपरिषदेत नाशिक विभाग व पुणे विभाग या जिल्यातील तालुकयातील विविध शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन ची प्रतिनिधी अजय चव्हाण व गणेश कातकाडे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याचप्रमाणे नाशिक विभागातील व पुणे विभागातील मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले त्यामुळे सदर बाल परिषद ही यशस्वी झाली.
