
आर्थिक स्वातंत्र्याची लढाई व शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक, कोटी कोटी शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा जागतिक कीर्तीचे कृषी अर्थतज्ज्ञ श्री शरद जोशी यांचा आज (दि. 12 डिसेंबर. ) स्मृतीदिन देशातील शेतकऱ्यांच्या गरीबी व दारिद्र्याचे मूळ शेतमालाच्या लुटीत आहे. शेतकऱ्यांना इतर नागरीकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे. यासाठी त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. या मागणीसह इंडिया व भारत ही संकल्पना श्री शरद जोशी यांनी पहिल्यांदा मांडली आणि सप्रमाण सिद्ध करून दिली. शेतकऱ्यांचे आत्मभान जागृत व संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले . कोणत्याही समस्येकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघण्याची व ती समस्या सोडवण्याची शिकवण दिली. शेतकरी महिला आघाडीच्या माध्यमातून लक्ष्मी मुक्ती कार्यक्रम राबवित महिलांना संपत्ती अधिकार व सन्मान मिळवून दिला. चतुरंग शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योजक होण्याचा मूलमंत्र दिला.देशातील समग्र शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढाई सुरू केली. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संशोधित नवीन बियाणे म्हणजेचे तत्रंज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी सरकारच्याअन्यकारक धोरणाविरुद्ध लढण्याचे बळ दिले .ज्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास, स्वाभिमान शिकविला .भारतीय परराष्ट्र सेवेत युनो मध्ये स्विझर्लंड जिनिव्हा येथे उच्च पदावर असताना .आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, कृषी धोरणे ,व्यापार याविषयी जवळून अभ्यास केला सुख वस्तू नोकरीचा त्याग करून महाराष्ट्रात पुण्याजवळ शेत जमीन घेतली पाच सहा वर्ष शेतीचा अंगारमळा फुलविला अनुभव घेतला, नंतर त्यांचा सुरू झाला खडतर शेतकरी संघटनेचा प्रवास ज्या प्रवासाने शेतकरी संघटनेने महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादक, विदर्भ मराठवाडा कापूस उत्पादक, नाशिक कांदा उत्पादक या शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी मोठे जन आंदोलन उभे केले बघता बघता ही चळवळ देशव्यापी बनली . हजारो, लाखो कार्यकर्ते शेतकरी संघटनेचा छातीवर बिल्ला लावून स्वाभिमानाने आत्मविश्वासाने जगायला शिकविले!चांदवड येथे भरलेल्या महिला आंदोलनातून एक नवी दिशा मिळाली फुकटचे नको कष्टाचे घामाच्या हवे एक नवा संदेश शेतकरी संघटनेने दिला .जोशीसाहेब म्हणजे जगा वेगळ व्यक्तिमत्व 2015 ला तब्येत बिघडली तेव्हा मृत्युपत्र तयार केले !सर्वांना वाटले मृत्युपत्र आपल्या मुलींच्या नावे करतील पण वकिलांना सांगितले माझा वाहन चालक बबनराव गायकवाड, सहकारी मित्र सुरेशचंद्र म्हात्रे व शेतकरी संघटना यामध्ये विभागून द्यावी असे सांगितल्यावर वकिला सह सर्व अचंबित झाले ।आजच्या राजकारणात विचार केला तर अशी दैदीप्यमान माणसे आज होणे नाहीत स्वतःच सुख वैभव पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केले अनेक संकटे अनेक आवाहने आली त्यामध्ये वैयक्तिक होती . पण तरी खचले नाही डगमगले नाहीत आलेल्या संकटाला सामोरे गेले ! दुर्दैव असे की ते शेतकऱ्यांसाठी लढत होते पण निवडणुका आल्या की शेतकरी जात ,धर्म संकोचित विचार करून दूरदृष्टी असणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या माणसापासून शेतकरी दूर जात होते ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल ! डंकेल प्रस्ताव गॅट करार मुक्त आयात निर्यात धोरण याविषयी अतिशय चिकित्सक आपली मते त्यांनी मांडली पण दुर्दैवाने ती राजकारण्यांनाही कळाली, शेतकऱ्यांनाही, असे खेदाने म्हणावे लागते.अशा शेतकऱ्यांचा पंचप्राण युगात्मा शरद जोशी साहेबांना त्यांच्या10 व्या स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
