
=अभिवादन सभा =
शेतकऱ्यांचे पंचप्राण, शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत,आपले संपूर्ण जीवन शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी समर्पित करणारे शरद जोशी यांचा उद्या (12 डिसेंबर ) स्मृतिदिन ! त्यानिमित्ताने सिन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) बारागाव पिंपरी रोड,सिन्नर येथील.प्रांगणात शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी, समितीचे अध्यक्ष कृष्णा घुमरे,आत्माराम पगार( स्वाभिमानी शेतकरी संघटना) डॉ.रावसाहेब जाधव( शरद जोशी प्रणित, शेतकरी संघटना) दत्ता वायचळे(महामित्र परिवार) यांच्यातर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.(सकाळी 10=30, मार्केट यार्ड,सिन्नर)
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे संदीप जगताप,जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे,निवृत्ती पाटील गारे (स्वाभिमान संघटना) शंकर ढिकले,रामनाथ ढिकले,कुबेर जाधव,विश्वनाथ मोरे आदी मान्यवरविस्थित राहणार आहे….तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.रावसाहेब जाधव यांनी केले.
