
ओझर: दि.११( वार्ताहर )येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात नवोदय स्पर्धा परीक्षे निमित्त विद्यार्थी अंतर्गत स्पर्धेसाठी पालक शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक पर्यवेक्षक दशरथ शिंदे नवोदय समिती प्रमुख शिक्षिका संगीता सोनवणे, अर्चना घुमरे उपस्थित होत्या. यावेळी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी नवोदय स्पर्धा परीक्षे संदर्भात आवश्यक सूचना उपस्थित पालकांना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेला कशाप्रकारे सामोरे जायचे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. समिती प्रमुख संगीता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात विद्यार्थी पालकांना माहिती दिली. याप्रसंगी अनेक पालकांनीही विद्यार्थी अभ्यासाबाबत मनोगत व्यक्त केले. फलक रेखाटन सविता पवार यांनी केले. पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.
