
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११६ वा दिवस
जेव्हा एखादी व्यक्ती धर्माचे शिक्षण देण्यासाठी म्हणून आपल्यापुढे उभी राहते तेव्हा त्या व्यक्तीचे सत्त्व काय हे प्रथम पाहिले पाहिजे. त्या सत्त्वावरच त्याच्या शब्दाची किंमत अवलंबून आहे, कारण गुरु हा आध्यात्मिक शक्तीचा प्रक्षेपक आहे. आतच जर आध्यात्मिक शक्ती नसेल तर तो कशाचे प्रक्षेपण करणार? मी एक दृष्टांत देतो. विजेची शेगडी जर गरम होत नसेल तर? तसेच अध्यात्मगुरूचे आहे. त्याच्याजवळ जर अध्यात्मशक्ती नसेल तर तिच्या लहरी तो शिष्यांपर्यंत कसा पोहोचवू शकेल? अध्यात्म-शिक्षण म्हणजे काही बौद्धिक शक्तींना चालना देणे नव्हे. प्रत्यक्ष जाणवणारी एक शक्ती गुरूकडून शिष्याला मिळत असते. आणि नंतर शिष्याच्या अंतःकरणात त्या शक्तीचा विकास होतो. म्हणून गुरूने सत्त्वसंपन्न, चारित्र्यसंपन्न असले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २० अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ११ डिसेंबर २०२५
★ १९१५ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्मदिन
★ १९२२ हिंदी चित्रपट अभिनेते मोहम्मद युसूफ ऊर्फ दिलीप कुमार यांचा जन्मदिन.
★ १९८७ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुढकथा लेखक गुरुनाथ आबाजी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी यांचा स्मृतीदिन.
★ १९९८ “ए मेरे वतन के लोगो” या अजरामर राष्ट्रभक्तीपर गीताचे रचिता कवी रामचंद्र नारायण द्विवेदी तथा कवी प्रदीप यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
