
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. पवार होते. समवेत संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास अहिरे, संदीप खरे, भावेश गायकवाड आदी पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.

प्रसंगी जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप, यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला. बबलू अहिरे व श्रावणी अहिरे यांनी स्वरचित कविता व भीमगीत सादर केले. निबंध स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते सहावी या लहान गटाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण, इयत्ता सातवी ते आठवी या गटाला डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य, नववी ते दहावी गटाला सामाजिक कार्य तर इयत्ता अकरावी व बारावी या मोठ्या गटाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य हा विषय देण्यात आला होता. सदर उपक्रमात १६० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. लहान व मध्यम गटाचे परीक्षण संध्या खोले, पूजा आहेर, नरेंद्र अहिरे यांनी केले तर मोठ्या गटाचे परीक्षण डी. जे. देवरे, आर. जे. जाधव, प्रा. पी. यु शिंदे व प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. गौरव दुकळे, श्रृती कोळपे, श्रावणी आहिरे, सारा शेख, राखी जगताप, ज्ञानेश्वर चोरमले, संजीवनी दुकळे, स्वप्नील कोळपे, संस्कृती माने, रिंकू कऱ्हे, वैष्णवी भालनोर, आकांक्षा आहिरे यांनी बक्षिसे पटकावली. यशस्वी विद्यार्थ्यांना महोत्सव समितीच्या वतीने ग्रंथसंच, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रा. डी. एस. जमधाडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले, तर प्रा. एस. टी. जाधव यांनी आभार मानलेत. भीम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
