हिंदु सनातन धर्माच्या कुठल्याही महापर्व वा उत्सवास अपशकुन करायचा ही हल्ली ढोंगी पुरोगामीवादी व नाटकी सेक्युलरवादयाचीं दिल्ली पासुन ते गल्ली पर्यंत मानसिकता बनली आहे.पण हीच कथित ढोंगी पर्यावरण वादी विल्होळी सारुळ परिसरात होत असलेल्या प्रचंड अवैध उत्खनन व जिवंत डोंगराला संपवणार्या प्रवृत्तीला बोलतानां कधी दिसत नाही ? वाढत्या शहरीकरणात हिरव्यागार एकटयादुकटया झाडाचा बळी जातोय त्याबद्दल कधी बोलणार आहात का ? अशी तीव्र टिका करत हे सगळे उदयोग प्रसिद्धीसाठी आहे अशी खरमरीत टिका सामाजिक कार्यकर्ते नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांनी केली आहे.
आज तपोवनातील धार्मिक विकासात्मक कार्याच्या आड येणार्यानीं कधी एक तरी झाड लावले आहे.झाडे लावणे ही सरकारची जबाबदारी आहे ही यांची मानसिकता.
ब्रिटिश कालखंडात हिरवीगार जंगले राखण्यासाठी खास जमिनी वनपट्टे म्हणुन राखीव केले गेले.या वनपट्टयाचीं आजमितीला कधी कुणी समिक्षा केली आहे का ? सगळी जंगले सफाचट झाली आहेत.मानवी वस्तीचे अतिक्रमण वाढले आहे. वनविभाग आज केवळ शोभेचा व सरकारचे दृष्टीने पोसायला जड झालेला पांढरा हत्ती बनला आहे, यावर ही कथित मंडळी कधी रस्त्यावर उतरलीय का ?
सारुळ सारख्या ठिकाणी शिपायापासुन ते वर मंत्रालयापर्यंत आर्थिक पेरणी केल्याने दांडगोबा झालेले अवैध उत्खनन सर्रासपणे करत आहेत. हे सगळयाच्यां संगनमताने चालणारे धंदे आहेत. विरोध करणार्याच्यां अंगावर गाडया घालण्यापर्यंत मस्तवाल पणा सुरु आहे.अशा ठिकाणी हे ढोंगी पर्यावरणवादी कधी आडवे पडुन मरायला उदार होणार आहेत ? तिथे हे लोक हिंमत दाखवतील का ? असा संतप्त सवाल ही गायकरानीं केला आहे.
गावागावाला शासन बाग लागवडीच्या नावाखाली, सुशोभिकरणाचे नावाखाली गाव व शहरानां लाखो रुपयाचा निधी दिला जातोय.मग हा निधी जातो कुठे ? किती सुशोभिकरणे झाली ? याचा पडताळा घेऊन निसर्ग र्हास करणार्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे कुठे ऐकलेय का ? असा ही संतप्त सवाल गायकर यांनी केला आहे.