
भालूर. ( प्रतिनिधी )-येथील मविप्र समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालूर ,येथे परसबागेतील पैशातून इ.6 वी च्या विद्यार्थ्यांकडुन गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री वैद्ये सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या उपक्रमशील उपशिक्षिका श्रीम. शिंनगारे मॅडम यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी सुंदर अशी परसबाग फुलवली

आणि त्यातून येणाऱ्या पैशातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आपले शालेय गणवेश, विद्यार्थी व प्राचार्य श्री वैद्य सर यांच्या हस्ते मुलांना देण्यात आले.

या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री वैद्य सर यांनी मुलांचे व मार्गदर्शन करणाऱ्या श्रीम. शिनगारे मॅडम यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढच्या वर्षी अशीच परसबाग फुलून अजून जास्तीत जास्त गरीब मुलांना मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
आणि परसबागेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
