
वंजारवाडी ( प्रतिनिधी ) माध्यमिक विद्यालय वंजारवाडी
येथे मानव अधिकार दिनानिमित्त 10/12/2025 रोजी एक दिवशीय कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले
याप्रसंगी मनमाड दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती क्रांती आर मोरे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत, मनमाड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सोनवणे ॲड. अग्रवाल ॲड .गव्हाणे नागेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार वंजारवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानव अधिकार दिन साजरा करण्यात आला न्यायाधीश क्रांती मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मानवी अधिकाराविषयी मार्गदर्शन केले बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड .सोनवणे यांनी व अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मानवी अधिकाराचे जाणीव करून दिली
मा .न्यायाधीश क्रांती मोरे यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले व बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सोनवणे यांचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र देवरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाघ व्ही एल यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. गुंजाळ व्ही के यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी जाधव या विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी श्री आहेर एन आर श्रीमती टी के बोराडे बाळासाहेब पवार सोपान घोरपडे संजीव कोळेकर श्री प्रकाश गुंडगळ बाबुराव गुंडगळ प्राथमिक शिक्षक बोरसे सर हे उपस्थित होते
