
ओझर ( वार्ताहर ) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक हेमंत भट यांनी केले. याप्रसंगी कर्मवीर गणपत दादा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी कर्मवीर गणपत दादा यांच्या कार्याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे नियोजन इ. दहावीच्या विद्यार्थिनींनी केले. फलक लेखन कलाशिक्षिका सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. आभार महेंद्र डांगळे यांनी मानले.
