
सिन्नर (प्रतिनिधी) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलीत डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते . व्यासपीठावर पर्यवेक्षिका जयश्री पगारे , सुनील ससाणे ,मारुती डगळे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते कर्मवीर मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तनुजा कडभाने,ऋतुजा वामने या विद्यार्थिनीनीसह उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी कर्मवीर मोरे यांच्या कार्याची ओळख करून दिली.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक उगले म्हणाले की ,मविप्र संस्थेचे आश्रयदाते तसेच आद्य संस्थापक सत्यशोधक कर्मवीर मोरे यांनी गोरगरीब जनतेची, समाजाची व मविप्र संस्थेची अहोरात्र सेवा केली. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच उगले यांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून दिला.केले.वर्गशिक्षक डी. ए.रबडे व जयश्री गोहाड मार्गदर्शनाखाली इयत्ता- १० वी तु-ब च्या वर्गाने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी संस्कृती वारुंगसे व ऋतुजा वारुंगसे हिने केले तर आभार प्रदर्शन श्रावणी माळी केले .यावेळी शिक्षक ,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
