
मविप्र संस्थेचे आद्यसंस्थापक सत्यशोधक कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक वृंद.
नांदगाव –( प्रतिनिधी)— मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेच पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे , उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते संपन्न झाले.

विद्यालयातील उपशिक्षक राजेंद्र कदम यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांचा कार्याचा परिचय करून देताना दादांनी आयुष्यभर शिक्षण ,शेती, श्रमसंस्कार ,सामाजिक न्याय या हक्कासाठी अखंड संघर्ष केला. शिक्षण हे फक्त पुस्तकी न राहता ते जीवनाला दिशा देणार असावं अशी कर्मवीर दादांची धारणा होती.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे यांनी आपल्या मनोगततून कर्मवीर गणपत दादा मोरे यांनी बहुजन समाज शिक्षित व्हावा आणि त्यांच्यातील अज्ञान दूर व्हावे यासाठी सत्यशोधक जलशांद्वारे मोठी चळवळ उभी केली.ते केवळ एक व्यक्ती नव्हते ,तर ती एक संकल्पना होती-संघर्षाची, शिक्षणाची आणि सामाजिक जागृतीची. असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
