
सिन्नर (प्रतिनिधी ) ९ डिसेंबर २०२५ महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले कीछत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.

ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व केले आणि अनेक लढायांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा पराभव केला, ज्यामुळे स्वराज्याचे अस्तित्व टिकून राहिले.
त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची स्थापना केली महाराणी ताराबाई यांना मराठा इतिहासातील एक शूर, कुशल आणि स्वाभिमानी योद्धा म्हणून ओळखले जाते,महाराणी ताराबाई भोसले यांचे ९ डिसेंबर १७६१रोजी सिंहगड येथे त्यांचे निधन झाले ज्यांनी स्वराज्यासाठी अतुलनीय योगदान दिले.अशा महान महाराणी ताराबाई भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे यांनी केले.व प्रास्ताविक रामु इदे यानी केले.तर आभार संजोग नाईक यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे,संजोग नाईक, विजय शिंदे, अनिल थोरात, अजित सोनवणे, रमेश गोंदके, लखन पाचोरे, अक्षय लोणारे,सुनिल जगताप आदि.उपस्थित होते.
