
सिन्नर (प्रतिनिधी). आज दि.9 डिसेंबर 2025 रोजी “सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था” संचलित ‘महात्मा ज्योतिबा फुले ‘ विद्यालय, सिन्नर येथे इंडियाज गॉट टॅलेंट स्पर्धेतील सेमीफायनलीस्ट श्री.हर्षद व सौ.दुहिता गोळेसर यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कारास संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे साहेब ,सेक्रेटरी नामदेव लोणारे साहेब ,सी.एस.आर समिती अध्यक्ष दत्तात्रय गोळेसर साहेब, शा.व्य.स.माध्य.विभाग अध्यक्षा मंगलाताई झगडे मॅडम,संचालक दत्तात्रय लोणारे साहेब उपस्थित होते.
त्याचबरोबर प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व महिला महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून या दांपत्याला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दुहिता व हर्षद यांनी सादर केलेल्या कानडा राजा पंढरीचा या गाण्याने संपूर्ण शैक्षणिक संकुल मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या प्रभारी पर्यवेक्षिका सविता काठे यांनी केले.
