
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११५ वा दिवस
काही लोकांना आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे, क्षमतेमुळे इतराहून अधिक धनदौलत मिळविता यावी हे अगदी साहजिक आहे, पण ज्यांच्यात या क्षमता वा बुध्दीचातुर्यने नाही त्यांच्यावर बेलाशक जुलूम करून त्यांना चिरडून टाकणे हे अन्यायाचे आहे. दुसऱ्यापेक्षा अधिकच्या सवलती प्राप्त करून घेणे हा विशेषाधिकार आहे. याविषयीच्या विशेषाकारांना हाणून पाडणे हेच पुरातन कालापासून नीतीचे ध्येय आहे. विविधता नष्ट न करता समत्व व एकता प्रस्थापित करू शकेल याप्रमाणे सगळ्या विशेषाधिकारांना पायाखाली तुडवून व आपल्यातील या प्रवृत्तीला जे काही पोषक आहे ते नष्ट करून ज्या ज्ञानाने संपूर्ण मानव जातीविषयी साम्यबुद्धी, समत्वभाव निर्माण होईल ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू या.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १९ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १० डिसेंबर २०२५
★ १८७० इतिहासाचार्य सर जदुनाथ सरकार यांचा जन्मदिन.
★ १८९६ स्वीडीश संशोधक आणि नोबल पुरस्काराचे प्रणेते अल्फेड नोबेल यांचा स्मृतीदिन
★ १९४८ जागतिक मानवी हक्क जागृती दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
