
अंदरसूल(प्रकाश साबरे).
अंदरसूल येथील प्रगतिशील शेतकरी भवानी म्हाळू नेवासकर यांचे वयाच्या 105 व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले कमी वयापासून गाई शेळ्या व मेंढरे यांना घेऊन रानोमाळ भटकंती करून कष्टाने जमिनी घेऊन शेती केली शतक पार करूनही अतिशय तब्बेत ठणठणीत ठेऊन शेवटचा निरोप घेतला त्यांना चळवळीतील कार्यकर्ते गोरख नेवासकर व दत्तु नेवासकर हे दोन्ही मुले शेती व्यवसाय करीत आहेत दोन्ही मुली सुखाने प्रपंच करीत आहेत शेवटपर्यंत सावलंबी जीवन चिकाटी परिश्रम करून कुटुंबियांना आधार दिला होता भवानी भाऊ यांनी निरोगी आयुष्य जगत 105 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला या कर्मवीर जेष्ठ नागरिक भवानी म्हाळू नेवासकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती ओम
