
नांदगाव (वार्ताहर ) आज दि ९ डिसेंबर २५ मंगळवार रोजी ना .शि. प्रसारक मंडळाच्या
” व्हि.जे. हायस्कूल नांदगाव ” विद्यालयामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि सरस्वती माता यांच्या पूजनाने झाली. कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष श्री संजीवजी धामणे सर , प्रमुख पाहुणे डाॅ.श्री उदय मेघावत (दंत रोगतज्ञ), शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे सर शाळेचे उपमुख्याध्यापक डॉक्टर श्री नांदुरकर सर तसेच शाळेचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री काकळीज सर आणि श्री मधे सर विज्ञान प्रमुख सौ रेश्मा पवार मॅडम हे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरून प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा संदेश दिला आणि विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेलचे कौतुकही केले. मुख्याध्यापक श्री लक्ष्मीकांत ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या शालेय जीवनातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या प्रदर्शनामध्ये सकाळ सत्र व दुपार दोनही सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये जवळजवळ 75 मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केलेले होते. मॉडेल बनवण्यासाठी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांची दिसत होती तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून मॉडेलचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या केलं.

प्रदर्शनातील बरेच मॉडेल पर्यावरण पूरक, अन्नसुरक्षा, जलसंधारण, प्रदूषण , रेन वॉटर हार्वेस्टिंग,शेती तसेच आयओटी यावर आधारित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आसावरी गायकवाड या विद्यार्थिनीने केले पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्रीमती दिपाली सांगळे मॅडम तसेच आयओटी वर आधारित माहिती व व्हिडिओ क्लिप विद्यार्थ्यांना श्रीमती निवेदिता सांगळे मॅडम यांनी दाखविली. विज्ञान मॉडेल चे परीक्षण विज्ञान शिक्षक श्रीमती विद्या महाले मॅडम तसेच श्री राकेश नन्नावरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अहवाल लेखन सौ रेश्मा पवार मॅडम यांनी केले. शालेय स्तरावर भरणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी सर्व विज्ञान शिक्षक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक श्री बेझेकर सर कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केले. !
