
आज तपोवनातील झाडा-झुडपाचां , लई जणाना पुळका आलाय ?
पण झाडे जगवा, झाडे वाचवा यासाठी, यांनी कोणता दिवा लावलाय ?
स्वत;चा सिमेंटी बंगला बांधायचं, पाप करतानां यांनी,
खरं सांगाव झाडाचा, जीवबळी नाही का दिला ?
अनं आता गळा काढुन ओरडताहेत, निसर्ग जगवा, निसर्ग वाचवा.
राग नका येऊ देऊ, पण शहरातली चाकरमानी मंडळी.
तुम्ही एकदा हिशोबच मांडा.
कोणे एके काळी, शेतकर्याचीच औलाद ना तुम्ही ?
इटुकल्या शहरातल्या फ्लँट साठी गावाच्या शेतीची कुणी केली माती ?
शपथ घेऊन सांगा, गावाकडं किती जणानीं झाडं, जमिनी राखल्या ?
पैशाच्या हव्यासापाई किती तरी जणानीं, जमिनी फुकुन टाकल्या.
निसर्ग संवर्धनाचा पुळका नुसता, विकासाला विरोध यांचा.
मागास राहिले कि हेच बोंबलणार, डबल ढोलकीचा सुर यांचा..
झाडानां विरोध नाही यांचा, आडुन सनातन हिंदु धर्माला आहे,
पुण्यनगरीत होऊ घातलेल्या, पावन कुंभ पर्वाला आहे.
झाडे वाचवा म्हणणार्यानीं, आयुष्यात झाडे किती लावली ?
तोडण्याचे पाप केले फक्त, किती निसर्ग संपदा राखली ?
तपोवनाचा पुळका नाही, सनातन विरोधीचां घोळका आहे,
फक्त सनातन(सरकार) बदनाम करण्याचा , शोधलेला मौका आहे?
कवी
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
मो.नं.9881329709
