
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११४ वा दिवस
मन जाणिवेच्या पलीकडे जाऊ शकते, आपले मन जणू एखाद्या तलावासारखे आहे, आणि आपण करीत असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या तलावात उठणारा एकेक तरंग, एकेक लाट आहे. ज्याप्रमाणे तलावात तरंग किंवा लाटा उसळतात, कोसळतात आणि विरून नाहीशा होतात, त्याचप्रमाणे चित्तातही विचारांचे तरंग वा लाटा सतत उठत असतात आणि मग विरून जात असतात; पण त्या अजीबातच नाहीशा होत नसतात. चित्तात उठणारे ते तरंग वा त्या लाटा क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, परंतु सूक्ष्मस्वरूपात विद्यमानच राहतात, आणि प्रयोजन पडताच केव्हाही फिरून उदित होण्यास तत्पर असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ९ डिसेंबर २०२५
★ १९४२ हिंदी चीनी मैत्रीचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा स्मृतीदिन
★ १९४६ भारतीय संविधान सभेची (घटना समितीची) दिल्ली येथे पहिली बैठक संपन्न.
★ १९४६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.
