
सिन्नर ( प्रतिनिधी) दिनांक ८/१२/२०२५ वार सोमवार रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१वी जयंती तिळवण तेली समाज देवी मंदिर येथे सिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पार्टी युवा नेते माननीय श्री उदय भाऊ सांगळे यांच्या हस्ते संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर माजी तहसीलदार मा.श्री दत्ताजी वायचाळे यांनी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची थोरवी सांगून जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराज यांच्या गाथेची लेखणी ही स्वतः जगनाडे महाराजांनी केली याबाबत सर्व माहिती सांगून सर्वांनी त्याप्रमाणे अनुकरण करावे असे सांगितले त्यानंतर बारा बलुतेदार आलूतेदार संघाचे शहराध्यक्ष श्री विनोद शितोळे यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज हे कोणा एका समाजापुरते मर्यादित न राहता त्यांचा इतिहास हा सर्व समाजा पर्यंत पोहोचवावा असे सांगितले त्यानंतर तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष श्री अरुण रामभाऊ रायजादे यांनी उपस्थित बांधवांचे आभार मानले या कार्यक्रम प्रसंगी कामगार नेते अनिल भाऊ सरावार, विनोद भाऊ शितोळे, बाबुराव सुरडकर, देविदास इंगळे , रामचंद्र इंगळे , विजय करपे , अशोक पन्हाळे, रामदास करपे, नितीन पन्हाळे , अनिल काळे , गणेश करपे, संतोष शेजवळ , अनिल पन्हाळे योगेशआंबेकर ,अक्षय पन्हाळे, प्रसाद काळे, राहुल करपे,
