
संतुने रक्षुणी तुकोबाची गाथा |
सशक्त केला अमुचा माथा ||
संत तुकाराम महाराजांनी लोकांनी सांगितलेला ज्ञान ज्या ग्रंथात शब्दबद्ध केले होते, त्या गाथेला रामेश्वर व मंबाजी भट आणि मनुवाद्यांनी गाथेला दगड बांधून इंद्रायणी नदीत बुडविले. ती गाथा, पांडूरंगाने नदीतून काढली. असे जे सांगितल्या जाते ते सत्य नसून आख्यीका आहे. संताजीचे महत्त्व लोकांना समजू नये, दोन समाजात एकी निर्माण होवू नये. यासाठी ती आख्यीका सांगीतल्या जाते. पुस्तक स्वतःहून पाण्यावर तरंगणे शक्य नाही. कोणतीही जडत्व असलेली वस्तू पाण्यावर तरंगणे शक्य नाही. मग पाण्यात बुडविलेली गाथा आम्हाला कशी उपलब्ध होवू शकली? तर ती संताजी जगनाडे महाराजांनी गाथेचे पूनर्लेखन केल्यामुळे. संताजी जगनाडे महाराजांना अनेक अभंग मुखोदगत होते. तसेच देहू, आळंदी, चाकण, खेड, पूणे परिसरात फिरून लोकांच्या मुखातून वदवून ती लिहून काढली. म्हणजे अभंग गाथा संताजीच्या लेखनीने लोकसागरातून तारली. म्हणून म्हणावं वाटतो…..
संतुने रक्षुणी तुकोबाची गाथा |
सशक्त केला अमुचा माथा ||
परंतु तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी, अंधश्रद्धेवर वार करणारे, बुवा- बापुंना सडो की पळो करून सोडणाऱ्या अभंगाना तारणारे संताजी जगनाडे महाराज मात्र उपेक्षित राहिले. याला वारकरी संप्रदाय सुद्धा अपवाद नाही…..
तुका होई व्यक्त, पण संतु अव्यक्त,
संतु व्यतीरिक्त, तुका असे रिक्त |
तुकोबाची गाथा, मुखोदगत केली,
म्हणूनी अवतरली, अवनिवरी ||
अशा संतजी जगनाडे महाराजांना विनम्र अभिवादन.
====== महामित्र दत्ता वायचळे ====
सिन्नर, नाशिक
