
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी-
नवनाथ गायकर यांजकडुन
स्थानिक स्वराज्य संस्थाच्यां निवडणुका या जाने.२०२६ च्या आत घ्या असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.अवघ्या दोन महिन्याच्या मुदतीच्या या तंबीमुळे प्रशासन खडबडुन जागे झाले आहे. दरम्यान या आदेशामुळे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा वेगाने तयारीला लागले आहे.एकुणच राजकिय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
महाराष्ट्रात पहिल्यादांच स्थानिक स्वराज्य संस्थाच्यां निवडणुका इतका अभुतपुर्व काळ लांबल्या आहेत.याचा विपरीत परिणाम गाव व शहरी कारभारावर झाला आहे.
तब्बल वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला आहे या निवडणुका थांबुन.यामुळे इच्छुकासह सर्वच घायकुतीला आले आहेत.
दरम्यान न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात म्हटले आहे कि स्थानिक स्वराज्य संस्थाच्यां निवडणुका आता फार लांबवु नका.जानेवारी २०२६ च्या अंतिम दिवसापर्यंत या निवडणुका उरकुन घ्या असे म्हटले आहे.या आदेशामुळे निवडणुक कामाला आता गती येईल अशी आशा राजकिय नेते, कार्यकर्ते व्यक्त करत आहे.
दुसरीकडे पडलेल्या जातनिहाय आरक्षणावरही काही आक्षेप असुन, त्यात बदलाची व जातनिहाय संवर्गास उचित न्यायाची मागणी केली आहे. हा ही वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असुन, सर्वच घटकानां योग्य न्याय देण्याचेही आदेश न्यायालयाने शासन, प्रशासनाला दिले आहेत.
न्यायोचित जातनिहाय आरक्षण प्रक्रियेचे योग्य पालन करता निवडणुका उरकल्याच तर अशा निवडणुकाही रद्दबातल करण्याचा सज्जड दम न्यायालयाने भरला आहे.
दरम्यान राज्यातील शेकडो नगरपरिषदा निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. आता महानगरपालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकाचें वेध लागले आहेत.
सर्व घटकानां समावेशी न्याय देत,निवडणुका तातडीने घ्या- माजी जि.प.सदस्य गोरख बोडके यांची मागणी
राज्यात इतका प्रदिर्घ काळ निवडणुका लांबल्याची ही पहिलीच वेळ आहे याचा विपरीत परिणाम शहर व गाव पातळीवर झाला आहे.
समाजातील सर्वच घटकानां यथोचित न्याय देत निवडणुक प्रक्रिया तातडीने राबवावी.
गोरख बोडके
प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य
लोकशाही मजबुतीकरण करा – गोपाळा लहांगे, माजी पं.स.सभापती
गावस्तर विकास मजबुतीसाठी सत्तेचे विक्रेंद्रीकरण केले गेले आहे.इतका प्रदिर्घ काळ ही प्रक्रिया लांबणे हे लोकशाहीसाठी हानिकारक आहे.त्यामुळे लोकशाही मजबुतीकरणासाठी शासन स्तरावर तातडीची गरज आहे.
गोपाळा लहांगे
माजी पं.स.सभापती ईगतपुरी
