नाशिक :(प्रतिनिधी ) येत्या १७ आणि १८ जानेवारी, २०२६ या कालावधीत पंचवटीच्या मखमलाबाद रोडवरील भावबंधन लॉन्समध्ये संपन्न होणाऱ्या चौथ्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनाची पहिली नियोजन बैठक येथील हुतात्मा स्मारकात संपन्न झाली.
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, समन्वयक किरण सोनार मंचावर उपस्थित होते. संमेलनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या. सुरेश पवार यांनी संमेलनाची रूपरेषा सादर केली. प्रत्येक विषयनिहाय सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते समित्या गठित करून संबंधितांना जबाबदारी देण्यात आली. उपस्थितांनी मांडलेल्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला. गत तीन संमेलनांप्रमाणेच चौथे संमेलनदेखील अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निधी संकलनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पुंजाजी मालुंजकर, साहेबराव नंदन, राजेंद्र उगले, सुहास टिपरे, मधुकर गिरी, अशोक कुमावत, सोमनाथ साखरे, डॉ.गिरीश पाटील, ॲड.सोमदत्त मुंजवाडकर, व्ही.व्ही.खैरनार, ब्रिजकुमार परिहार, पोपटराव देवरे, सुभाष सबनीस, माणिकराव गोडसे, ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे, सुनंदा पाटील, शितल कुयटे, भाग्यश्री चौधरी, माधुरी अमृतकार, सविता दरेकर, प्राचार्य मानसी देशमुख, सविता पोतदार, सुजाता येवले, अलका अमृतकर, उज्वला वडनेरे, रामचंद्र शिंदे, राजेंद्र सोमवंशी, दत्तू दाणी आदींसह साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले तर किरण सोनार यांनी आभार मानले.