
सिन्नर ( प्रतिनिधी )०६डिसेंबर २०२५ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ४९ वा स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंञ्य लढ्यातील स्वातंञ्य सेनानी होते.तसेच ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय सहभाग होता.त्यांनी ब्रिटीश शासनाला प्रतीसरकार उभारले होते.त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा व महर्षी शाहु महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता गरिबांना न्याय मिळवून देणे, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडाबंदी, बिनखर्चाचे विवाह करणे, संपूर्ण दारूबंदी, जुगारबंदी, गुन्हेगारांना शिक्षा, स्त्रियांना संरक्षण, वाचनालय सुरू करणे, काळाबाजार रोखणे, सावकारशाही नष्ट करणे आदी

महत्त्वपूर्ण कार्य प्रतिसरकारने केले. इंग्रजांच्या काळात संपूर्ण देशभर जुलमी राजवट असताना सातारा, सांगली परिसरात सामान्य जनतेचे सरकार म्हणजेच प्रतिसरकार होते. नाना यांनी युवकांची एक आघाडी स्थापन केली. त्या आघाडीला तुफान सेना असे नाव दिले. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड, नागनाथअण्णा नायकवडी हे नाना यांचे तरुण तडफदार, निर्भीड, लढवय्ये शिलेदार होते. कष्टकरी, शेतकरी, मजूर, स्त्रियांचा विकास व्हावा यासाठी काँग्रेसमधील केशवराव जेधे, कर्मवीर भाऊराव पाटील, तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत आदींनी ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. नाना शेतकरी कामगार पक्षात आले. ते शेतकरी कामगार पक्षाचे धुरंदर, लढवय्ये, स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेते होते. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. नाना हे १९५७ मध्ये सातारा आणि १९६७ मध्ये बीड येथून दोन वेळा खासदार झाले. जनमाणसाच्या हक्क व अधिकारांसाठी संसदेत मराठी भाषेतून आवाज उठवणारा महाराष्ट्रातील पहिला खासदार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील! केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य नव्हे, तर जनतेला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, यासाठी नाना यांनी आवाज उठवला..स्वातंञ्यानंतर सिन्नर येथे काकासाहेब वाघ,सूर्यभान गडाख (नाना) गोपीनाथ म्हसाळ यांच्या नेत्रृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटलांची सवाद्य ३०० बैल गाडीवरून मिरवणूक काढली होती.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन योगेश मोरे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार बाळू पारे यांनी मानले
या वेळी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, संदिप मुठे,पोपट शिळकंदे विशाल मुंढे,धीरज हांडे,करण पवार, अमित गांगुर्डे, गणेश पवार, बाळू पारे योगेश मोरे बाळनाथ कार्ले, उपस्थित होते.
