
सिन्नर ( प्रतिनिधी ) ६ डिसेंबर २०२५आदिवासी ह्रदयसम्राट माजी आदिवासी विकास मंत्री माजी विरोधी पक्षनेते निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माननीय निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब हे पहिल्यापासून हुशार व्यक्तीमत्व होते त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाचं महत्त्व प्राप्त झालं होतं.त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झालं तेथे त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला आणि त्यांनी नोकरी न करता समाज सेवा करण्याचा निर्णय घेतला व राजकारणात प्रवेश करून समाज सेवेला सुरूवात केली.

ते आदिवासी समाजाच्या न्याय हक्क- अधिकारासाठी सातत्याने संघर्ष करत होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड साहेब त्यांनी अनेक मंत्रीपद भुषविले आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींसाठी वेगळं बजेट, आदिवासी मध्ये बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी केलेला कायदा, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पेसा कायद्याची निर्मिती,आदिवासी विकास भवन, आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची निर्मिती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा व आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास पुढे आणण्याचं काम, भंडारदरा धरणाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नामकरण,शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणाची निर्मिती,अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्माण करण्याचं काम असे अनेक कामं मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले.सर्व धर्म समभाव या न्यायाने कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं या लोकनायकाचा मृत्यू ०६ डिसेंबर २०२४ रोजी झाला.अशा या जलनायकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन किशोर बो-होडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, बाळासाहेब मुठे, प्रकाश गुंजाळ किशोर, बो-होडे कचरु कराड,पुंडलिक बलक,बाळू पारे किरण मुठे,शाम डांगे योगेश मोरे बाळनाथ कार्ले आदि.उपस्थित होते.
