
सिन्नर -( प्रतिनिधी )
येथील राष्ट्र सेवा दलाचे धडाडीचे सैनिक दिवंगत हेमंत (दीपक) नि-हाळी यांचे परवा गुरुवार दि. ४ डिसेंबरला निधन झाले. पंचवटी, नाशिक येथील अमरधाम मध्ये विद्युत दाहिनी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
दिवंगत हेमंत दीपक नि-हाळी यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्र सेवा दल, सिन्नर तर्फे तसेच समविचारी संघटनेतर्फे सहवेदना सभा घेण्यात आली. या सभेत आपल्या प्रास्ताविकात महामित्र दत्ता वायचळे यांनी दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या संघटनात्मक व सामाजिक योगदानाची माहिती दिली
महाअंनिसचे अरुण घोडेराव यांनी आपल्या आदरांजलीपर मनोगतात हेमंत नि-हाळी यांच्या अभ्यासू व कामसू स्वभावाचा दाखला देत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या कार्याचा आढावा घेतला.
काॅम्रेड हरिभाऊ तांबे यांनी आपल्या आदरांजलीपर मनोगतात दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या सामाजिक चळवळीतील बांधिलकीचा मुद्दा अधोरेखित केला.
सेवा दलाचे विलास पाटील यांनी दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या सेवादलाची शाखासहभागाचे काम व त्याचे महत्त्व विशद केले तर सागर गुजर यांनी दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या सेवादृल परिवाराचे विविध उपक्रम समाजोपयोगी कसे होते ते सांगितले.
धनंजय कपूर यांनी दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या बालपणीच्या मैत्रीचा ऋणानुबंध व्यक्त केला.
दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या भगिनी अलका एकबोटे तसेच वसंत एकबोटे यांनी हेमंतची जडणघडण, कौटुंबिक माहिती व सामाजिक योगदानाचे पैलू उलगडून दाखवले.
याप्रसंगी ‘खरा तो एकचि धर्म ‘ ही समूह प्रार्थना म्हणण्यात आली. दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या एअरफोर्सच्या अखेरच्या मानवंदनेची व विद्युतदाहिनीतील आगळ्यावेगळ्या अंत्यविधीची माहिती देण्यात आली.
सहवेदना सभेस दिवंगत हेमंत नि-हाळी यांच्या कन्या केतकी, पुत्र कैवल्य, देविदास गुजर, डॉ. आर. टी. जाधव, सूर्यभान धाकराव,संजय सांगळे , अनिल साबळे, स्नेहल एकबोटे, किशोर नि-हाळी, अनिल भाटजिरे, विजय मुठे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
