
मालेगाव (वार्ताहर) – भारतीय बौद्ध महासभेच्या मालेगाव शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी सामूहिक पंचशील, वंदना घेऊन घोषणा देण्यात आल्या. यावेळी बौद्ध महासभेचे संघटक काशिनाथ केदारे, श्रीमती केदारे, प्रा. राजेंद्र मोरे, मालेगांव शहर व ग्रामीण भागातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासभेच्या मालेगांव ग्रामीण शाखेचे सरचिटणीस दादाजी जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अमोल अहिरे यांनी केले, तर तालुका ग्रामीण कोषाध्यक्ष भिमराव उबाळे यांनी आभार मानलेत.
