
नांदगाव (वार्ताहार ) आज दिनांक ६/१२/२०२५रोजी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदयालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. ल. ना. ठाकरे सर, उप मुख्याध्यापक डॉ. श्री.नांदूरकर सर , शिक्षक प्रतिनिधी श्री. प्रविण अहिरे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. भूमिका हिरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.
श्री. ठाकरे सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्तविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मिती योगदाना विषयी माहिती दिली. आजचे प्रमुख वक्ते डॉ. श्री. नांदुरकर सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग विद्यार्थ्यासमोर सादर करून एकाग्रतेचे व वाचनाचे महत्व विषद केले.

या निमित्ताने इ 9वी च्या विद्यार्थीनी कु.विशाखा दुसाने, कु. ईश्वरी जाधव, कु. श्रद्धा बोगीर, कु. सायली जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती आपल्या भाषणातून सादर केल्या.कु. आरती खाडे हिने *चवदार तळ्याचा सत्याग्रह* याविषयी कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निरीजा वाघमारे व आभार प्रदर्शन कु. संकेत थोरे याने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन इ. ९वी चे वर्गशिक्षक श्रीम. सांगळे दि. द. व श्रीम. प्रा. गो. आहेर यांनी केले.
कार्यक्रमास सर्व शालेय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
