
ओझर दि.६( वार्ताहर)येथील ‘मविप्र’ समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रणिता जोंधळे व सिद्धेश मोरे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी डॉ आंबेडकरांवर कविता सादर केल्या.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे उद्धारक आणि बौद्ध धम्माच्या समता व मानवतावादी आचार विचारांचे पुनर्जीवन घडविणारे महान दृष्टे व्यक्तिमत्व होते या शब्दात विचार व्यक्त केले. फलक रेखाटन मोनाली निकम सविता पवार मोहन क्षीरसागर यांनी केले. शिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव यांनी विद्यार्थी शिस्तीसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी केले. आभार शिक्षिका शितल हांडोरे यांनी मानले.
