
अंदरसूल(प्रकाश साबरे).
अंदरसूल येथे श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे काही पदाधिकारी मयत झाल्याने कामकाज बंद होते त्या बंद संघाचे पुनर्जीवन करण्यात आले येथील गावातील विठ्ठल मंदिर येथे येवला येथील जेष्ठ नागरिक संघाचे फेस्कॉम चे वरिष्ठ पदाधिकारी येवला स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेस येवला संघाचे सरचिटणीस कृष्णा काशीनाथ शिंदे तालुका संघटक गुमानसिंह परदेशी व अंदरसूल जेष्ठ नागरिक संघाचे कृतिशील सचिव रामदास पोलाद गोसावी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या बैठकीत जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक जेष्ठ सद्यस हरिश्चंद्र ब्राह्मणे व कचरु पाटील वल्ट्टे उपस्थित होते या वेळी मयत जेष्ठ नागरिक व सर्व क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन कामकाज सुरु करण्यात आले या वेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची घोषणा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेले ॲड बाबासाहेब देशमुख व जेष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ साबरे यांनी केली त्यामध्ये संघाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पुंजाजी सोनवणे उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सखाहरी वडाळकर सचिव म्हणून मच्छिंद्र कचरु वल्ट्टे आणि कोषाध्यक्ष म्हणून ईश्वरलाल निवृत्ती पुंड यांची निवड करण्यात आली व सल्लागार म्हणून ॲड बाबासाहेब देशमुख व जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांची निवड करण्यात आली या वेळी प्रास्ताविक पंडित मेहकर सर यांनी केले मनोगत पंडित मेहकर शिवाजी वडाळकर ईश्वर पुंड मच्छिंद्र वल्ट्टे यांनी व्यक्त केले जेष्ठ नागरिक संघाचा लेखाजोखा व मार्गदर्शन जेष्ठ माजी सचिव रामदास गोसावी यांनी केले त्याच प्रमाणात जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यप्रणाली संदर्भात कृष्णा शिंदे व गुमानसिंग परदेशी यांनी मार्गदर्शन केले ॲड बाबासाहेब देशमुख व जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नागरिक संघाचे तालुक्याचे कृतिशील जेष्ठ नेते व मार्गदर्शक रावसाहेब दाभाडे गुरुजी यांनी जेष्ठ नागरिक संघाचे प्रमुख उद्देश शासनदरबारी शासकीय जेष्ठ नागरिक यांचे साठी विविध मागण्यासाठी उभारलेले लढे संघर्ष व त्यानंतर शासनाने जेष्ठ नागरिक यांना आज मितीस मिळत असलेल्या सवलती यांची संपूर्ण माहिती जेष्ठ नागरिक यांना दिली ज्येष्ठांनी हसत आयुष्य जगावे आर्थिक स्थिती ज्या जेष्ठ नागरिकांची आहे अशा ज्येष्ठांनी गरजवंत जेष्ठ नागरिक यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्नशील असावे त्याच प्रमाणे गाव तेथे जेष्ठ नागरिक संघाचे असावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले व सर्व जेष्ठ नागरिक यांना बहुमोल मार्गदर्शन केले नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व जेष्ठ जुने सद्यस यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन शिवाजी वडाळकर व मच्छिंद्र वल्ट्टे यांनी व आभार ईश्वर पुंड यांनी मानले
