
नांदगाव ( प्रतिनिधी ):-शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘ मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेने नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील सुपुत्र मनोज बन्सी डोंगरे यांना राज्यस्तरीय “गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने गौरवले आहे. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरखेड येथे कार्यरत आहेत.
५ डिसेंबर रोजी नाशिक येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेमार्फत राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आयोजित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध गुणीजणांना सन्मानित करण्यात आले.

नाशिक जिल्यातील मनोज डोंगरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मनोज डोंगरे यांनी ग्रामीण भागात कार्यरत राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुप्त गुणांचा विकास, विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि सामाजिक जाणिवेच्या कार्यातून एक आदर्श शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत त्यांना निसर्ग समिती धुळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘रोटरी क्लब नाशिकचा ‘नेशन बिल्डर अवार्ड’, बागलाण वृत्तसेवेचा ‘स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार’, बी. द. फाउंडेशन शिर्डी यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक यांचा ‘साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव सुरू झाला आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व स्नेहाजणांनी त्यांचे अभिनंदन केले.
