
सिन्नर (प्रतिनिधी ) ०६ डिसेंबर २०२५ महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्रज्ञ,कायदेपंडीत,राजनीतिज्ञ,लेखक,समाजसुधारक,तत्वज्ञ,भारतीय संविधानाचे शिल्पकार,मानवी हक्कांचे कैवारी,स्वातंञ्य भारताचे प्रथम कायदामंञी,व बौध्द धर्म पुनरूत्थानक होते.तसेच बहुआयामी व बहुश्रुत व्यक्तीमत्व असलेले डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्रज्ञ,मानववंशशास्रज्ञ,इतिहासकार,शिक्षणतज्ज्ञ,धर्मशास्रज्ञ,प्राध्यापक,बँरिस्टर,वक्ते,पञकार,जलतज्ञ,संपादक,स्वातंञ्यसेनानी,संसदपटू,स्रीयांच्या हक्काचे कैवारी,मजुरमंञी आणि भारत देशातील कोट्यावधी शोषीत पददलीतांचे उध्दारक होते.क्रांतिकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान होते.

देशाच्या सामाजिक,आर्थिक,राजनैतिक,कायदा,शैक्षणिक,संस्कृतीक,विद्युत,जल,कृषी,स्रीउध्दार,कामगार,शेतकरी,औद्योगिकीकरण,दलितोध्दार,अशा अनेक क्षेञात अतुलनिय योगदानामुळे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जातात.”शिका, संघटित व्हा, संघर्ष करा “हि त्यांनी प्रेरणा जनतेला दिली.बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे मागासवर्गियांना स्त्रीयांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले.ते संविधान टिकवण्याची प्रत्येक सरकारची व जनतेची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेंद्र दिवे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार धोंडिराम जगताप यांनी मानले
या वेळी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,राजेंद्र दिवे,धोंडीराम जगताप, जगदीश ठाणेकर,सुनिल रूपवते, अशोक बाबाराधु साळवे,प्रभाकर उघाडे,वसंत मोरे अदि उपस्थित होते.
