
मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, अशोक मार्कंड व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगाव –( प्रतिनिधी) मविप्र संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
उपशिक्षक रवी कवडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकात्म, सार्वभौम आणि लोकशाहीने भारताचा पाया रचला. संविधामुळेच आज प्रत्येक भारतीयाला ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार प्राप्त झाला. डॉ बाबासाहेबांचे कार्य एका विशिष्ट समाजापुरते नव्हते, तर ते संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी होते.त्यांचे विचार आपल्या मनात, कृतीत आणि धोरणांमध्ये जिवंत ठेवण्याचे आवाहन केले.
विद्यालयातील विद्यार्थी वेदिका जाधव हिने आपल्या मनोगतातून महामानव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण केले.
उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कौटुंबिक जीवन कार्याचा लेखाजोखा मांडला.
कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन म्हणजे संघर्ष,त्याग, आणि निस्वार्थी सेवेची गाथा आहे.त्यांनी शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. शिक्षण हेच परिवर्तनाचे आणि प्रगती साधन आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरणात आणणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व सेवक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
