नासाका विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यार्थी, शिक्षक-कर्मचारी.
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोनाली मोरे, हर्षल उगले, धनश्री मोरे, कल्याणी गोसावी या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाध्यक्ष मुख्याध्यापक अरुण पगार यांनीही डॉ.आंबेडकरांच्या ध्येयनिष्ठ वाटचालीवर प्रकाश टाकला. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी प्रास्ताविक केले तर रवींद्र मालुंजकर यांनी आभार मानले.