
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१११ वा दिवस

विविधतेचा विनाश करून बाह्य विश्वात एकत्वाची स्थापना करणे हे नीतीचे कार्य कधीही नव्हते व पुढेही राहणार नाही, कारण हे असंभाव्य आहे व त्यामुळे विनाश व मृत्यू ओढवेल. पण नीतीचे ध्येय आहे विविधतेत एकत्व अनुभवणे, भीतिदायक परिस्थितीतही हृदयात ईश्वराची प्रचिती घेणे, बाह्यतः दुर्बलता दिसत असली तरी सर्वांच्या ठायी असलेली अनंत शक्ती ओळखणे आणि वरवर सर्व गोष्टी विपरीत दिसत असल्या तरी आत्म्याच्या अनंत, शाश्वत, स्वाभाविक शुद्धतेचा प्रत्यय घेणे. हेच आपल्याला जाणून घ्यावयाचे आहे. भारतीय मनोवृत्ती म्हणजेच वेदान्ती मनोवृत्ती विश्लेषणाभिमुख असल्यामुळे तिला विश्लेषणातून एकत्व गवसले आणि म्हणून तिने एकत्वाच्या तत्त्वावरच सर्व गोष्टी आधारित करण्याचा प्रयत्न केला.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १५ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५
★ १९५६ महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा स्मृतीदिन, महापरिनिर्वाण
★ १९७६ पत्री सरकारचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
