नाशिकरोड:- सातारा येथे १ ते ४ जानेवारी या कालावधीत संपन्न होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मानाच्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोडच्या सभासद कवयित्री सविता प्रशांत पोतदार यांची निवड झाली आहे.
अनेक भावस्पर्शी काव्य रचनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पोतदार यांनी विनोदी कथादेखील लिहिल्या आहेत. त्यांच्या निवडीचे अध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष रवींद्र मालुंजकर आणि ॲड.सुदाम सातभाई, जिल्हा प्रतिनिधी ॲड.नितीन ठाकरे, प्रशांत केंदळे, मिलिंद गांधी, प्रमुख कार्यवाह शिवाजी म्हस्के, कार्यवाह रेखा पाटील, कोषाध्यक्ष दशरथ लोखंडे, अलका अमृतकर, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, वृंदा देशमुख, कांचन पवार, मानसी घमंडी आदींनी स्वागत केले आहे.