
सिन्नर (प्रतिनिधी )५ डिसेंबर २०२५ जागतिक आदिवासी नेता नेल्सन मंडेला यांच्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात नेल्सन मंडेला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
नेल्सन मंडेला यांना आफ्रिकेतील लोकशाहीचे जनक मानले जाते.दक्षिण आफ्रिकेत गोरा काळा रंगावरून भेदभाव केला जात असे.त्या विरूद्ध आवाज उठवून भेदभाव नाहीसा होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली व संघर्ष केला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले.नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी यांना प्रेरणास्थान मानून त्यांनी सत्य अहिंसेची जोपासना केली. लोक त्यांना राष्ट्रपिता म्हणत असत.नोव्हेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने रंगभेद विरोधी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेतली व त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस १८ जुलै हा “मंडेला दिवस” म्हणून घोषित केला.त्यांना त्यांच्या कामगिरी बद्दल जगातील अनेक देशांनी संस्थांनी सन्मान व पुरस्कार दिले.प्रा.हरी नरके यांनी महात्मा फुले यांचं गुलामगिरी हे पुस्तक नेल्सन मंडेला यांना भेट दिलं आहे अशा या मानवतेच्या पुरस्कर्त्याचा मृत्यू ५ डिसेंबर २०१३ ला झाला.त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक ब्रिगेडचे सहसंस्थापक विजयभाऊ मुठे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,एकलव्य संघटनेचे अध्यक्ष किरणभाऊ मोरे,आकाश धोंगडे प्रकाश गुंजाळ जीतेंद्र सुर्यवंशी सुनिल जगताप संदिप मुठे आदि.उपस्थित होते.
