
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी):- अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) या राष्ट्रीय व्यावसायिक संस्थेने मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक (मविप्र) यांना ‘भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था – 2025’ हा मानाचा पुरस्कार आज २९ नोव्हेंबर रोजी पुद्दुचेरी येथे मिळाला. कार्यक्रमप्रसंगी श्री. सत्य पाल सिंह, मा. केंद्रीय राज्यमंत्री मानव संसाधन विकास (उच्च शिक्षण), ISTE चेअरमन डॉ. प्रतापसिंह के. देसाई, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुद्दुचेरी येथील श्री मनकुला विनायगर अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ५५ व्या ISTE राष्ट्रीय वार्षिक प्राध्यापक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीनजी ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, मविप्र संचालक अॅड. संदीप गुळवे, रमेश पिंगळे, अॅड. लक्ष्मण लांडगे, डॉ. सतीश देवणे, प्राचार्य, मविप्र केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक, प्रा. प्रशांत एन. पाटील, प्राचार्य, मविप्र आरएसएम पॉलिटेक्निक, नाशिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी ISTE चे मनःपूर्वक आभार मानले.
