
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११० वा दिवस
जीवन विकास व सुख शांती या साऱ्यांना आवश्यक अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे विचार आणि आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर मानव म्हणा, मानववंश म्हणा, समाज म्हणा, की राष्ट्र म्हणा त्यांचे पतन अटळ आहे. विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याप्रमाणे माणसाला अत्यावश्यक असते, त्याचप्रमाणे जोवर त्याच्या हातून इतरांचे अनिष्ट होत नाही तोवर त्याला आहार, विहार, पेहराव आदी सर्वच बाबतीत पूर्णपणे स्वातंत्र्य असायला हवे. बंधनात गुरफटून गेलेला समाज अथवा राष्ट्र प्रगती वा विकास करु शकत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५
★ १९५० महर्षी योगी अरविंद यांचा स्मृतीदिन
★ २०१३ दक्षिण आफ्रिकेचे पहिले अश्वेतवर्णीय (कृष्णवर्णीय) राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक माती दिन.
