
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात सरत्या वर्षाला निरोप देताना अजरामर भक्तिगीते आणि भावगीते यांची सुरेल मैफिल रंगली.
मैफिलीत सहभागी झालेल्या सुप्रसिद्ध गायिका अनिता जोशी आणि वंदना नाईक यांनी जय शारदे वागेश्वरी, जय शंकरा गंगाधरा, आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले, ब्रह्मा-विष्णू आणि महेश्वर, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, खेळ मांडीयेला वाळवंटी काठी, तोच चंद्रमा नभात; तीच चंद्र यामिनी, स्वप्नात आले माझ्या, रात्रंदिवसा देवा तुमची, जगत वंद्य अवधूत दिगंबर, तोडीता फुले मी सहज पाहिला जाता, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, निर्गुणाचा संग धरीला जो आवडी, पैल तो गे काऊ कोकताहे, चिंधी बांधते द्रौपदी, आजी सोनियाचा दिनु, रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी अशी जुन्या काळातील एकापेक्षा एक सरस लोकप्रिय गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
प्रकाश भालेराव (तबला), भूषण सोनवणे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, दत्ता कुलकर्णी, विजय गीत, जयवंत दाणी, वसंत उपासनी, गोविंद पांडे, चांगदेव बोराडे, राम कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, मृणाल प्रभुणे, ज्योती जोशी, वैदेही कुलकर्णी, वृंदा पिंपळखरे, जयश्री नाईक, उषा गीत, सिंधू उपासनी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाध्यक्ष सुनंदा गोसावी यांनी आपल्या भाषणात वंदना नाईक या अंध असूनसुद्धा अतिशय परिश्रमपूर्वक मुंबईत संगीत शिक्षण घेत पदवी मिळविली. अनिता जोशी यांनीसुद्धा त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर गीते सादर केल्याबद्दल दोन्ही गायिकांची स्तुती केली. कल्याणी देशपांडे यांच्यासमवेत सूत्रसंचालन करणाऱ्या सुप्रिया बनसोड यांनी त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना सादर केली. सुधाकर सोनवणे यांनी पुढील कार्यक्रमाचे निवेदन करत आभार मानले.
