
सिन्नर (प्रतिनिधी )४ डिसेंबर २०२५ राॅबिनहुड तंट्यामामा भिल्ल यांच्या १३६ व्या स्मृतीदिनानिमीत्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! करण्यात आले.
यावेळी रॉबिनहुड तंट्यामामा भिल्ल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की तंट्यामामानी १८७८-१८८९ या कालखंडात मध्यप्रदेशच्या सातपुडा भागामध्ये टोळी उभारून सावकार जमीनदार, इंग्रज, पैसेवाले यांच्या विरोधात बंड पुकारले लोक सावकार,जमीनदार,इंग्रज यांच्या जुल्मी अन्याय,अत्याचाराला कंटाळले होते .त्याचा बिमोड करण्यासाठी तंट्यामामानी अनेक साथीदार गोळा केले.तरूण जवानांची फलटण तयार केली.इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.तंट्यामामानी सावकार जमिनदार, पैसेवाल्यांना लुटून गोरगरीबांना मदत केली.शुर,धाडसीपणामुळे लोक त्यांना राँबिनहुड म्हणू लागले.तसेच त्यांनी अनेक गोरगरीबांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी पैसे देत होते त्यामुळे लोक त्यांना “तंट्यामामा” म्हणत.एकदा इंग्रजांसोबत झालेल्या चकमकीत तंट्यामामाला गोळी लागली ते जख्मी झाले.त्यांना पकडले गेले व जबलपुरच्या कोर्टात त्यांच्यावर खटला चालला.त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून ४ डिसेंबर १८८९ ला फाशी देण्यात आले.तंट्यामांमाचं स्मारक असलेल्या पाताळपाणी येथे आजही त्यांना अभिवादन करण्यासाठी रेल्वे थांबते यावरून त्यांचं कार्य किती महान होतं हे यातून दिसून येतं.तंट्यामामानी आदिवासींना आपल्या अस्मीतेसाठी, हक्क,अधिकारासाठी,अस्तीत्वासाठी संघर्ष करण्यास शिकविले अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन आकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे,
राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,किरण मुठे आकाश धोंगडे,शाम डांगे गणेश जाधव,रमेश आव्हाड प्रकाश गुंजाळ, नारायण परदेशी, योगेश सोनवणे,आदी उपस्थित होते.
