
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०९ वा दिवस
पारमार्थिक गुरूने साधकामधे संक्रामित केलेल्या ज्ञानापेक्षा अधिक उच्च आणि अधिक पवित्र असे काहीही नाही. जर एखादा मनुष्य पूर्ण योगी झालेला असेल, तर त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती आपोआपच होते. ती ग्रंथांतून होऊ शकत नाही. तुम्ही जरी जगाचे चारही कोपरे धंडाळले किंवा हिमालय, आल्प्स, कॉकेशस हे पर्वत किंवा गोबीचे अथवा साहाराचे वाळवंट किंवा समुद्राचा तळ या सर्व ठिकाणी जरी शोध केला, तरी ते ज्ञान तुम्हाला गुरू भेटेपर्यंत कदापि लाभणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल १४ पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५
★ दत्त जयंती गाणगापूर
★ १९१० स्वातंत्र्यसेनानी, भारताचे माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचा जन्मदिन
★ १९२४ मुंबईस्थित भारताचे प्रवेशद्वार “गेटवे आफ इंडियाचे उद्घाटन
★ भारतीय नौदल दिन.
