
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०८ वा दिवस
कोणत्याही तात्कालिक सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्याचा माझा मुळीच मानस नाही. समाजातील दोष दूर करण्यासाठीही मी उभा नाही. मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की आपल्या पूर्वजांनी मानवी विकासासाठी एक परिपूर्ण योजना आपल्यापुढे ठेवली आहे. ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी पुढे व्हा. मानवामानवातील अतूट नात्याची, माणसांमध्ये असलेल्या सुप्त दैवताची अनुभूती घ्या. तिचे प्रकटीकरण करा. माणसा-माणसातील भेद दूर करा. एकत्रित या, आणि संघटीतपणे कार्य करा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५
★ १८८४ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्मदिन
★ १९५१ खान्देशकन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन
★ १९७१ पाकिस्तानने भारतावर हल्ला केला
★ १९८४ भोपाळ मधिल वायु दुर्घटनेत २० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यु
★ जागतिक अपंग दिन.
